कांद्याच्या सालीचे असेही फायदे…आपल्या आरोग्यसाठी आणि सौंदर्यासाठी या प्रकारे होऊ शकतो कांद्याच्या सालीचा फायदा

कांद्याचे काय फायदे आहेत हे जवळपास सर्वांनाच माहीत असावेत. पण कांदा कापल्यानंतर जी साल आपण कचऱ्यामध्ये टाकून देतो त्याचे फायदे अनेकांना हे माहीत नाहीत. कांद्याच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. अनेक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काद्यांची साल उपयोगी पडू शकते. चला जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे फायदे.

कांद्याच्या सालीचे फायदे:-

कांद्याची साल रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. तसेच जर,

तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर कांद्याची साल वापरण्यास सुरवात करा. त्याच्या सालाचा रस घेतल्यास तुम्ही तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. कांद्याच्या सालामध्ये असणारे ऑक्सिडेंट्स आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.

तसेच आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की कांद्याच्या सालामध्ये कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर ते शरीरातील जळजळ देखील कमी करू शकतात. खरं तर, कांद्याच्या सालामध्ये असलेले फायबर फ्लेव्होनॉइड्स, क्वेरेसेटिन आणि फिनोलिक हे आपल्याला बरेच आरोग्यदायी फायदे देतात.

जर तुम्हाला स्कीन अॅलर्जीची समस्या असेल तर कांद्याची साल तुम्हाला फायदेशीर ठरते. रात्रभर कांद्याची साल पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी स्किनवर लावा. काही दिवसांतच आराम मिळेल

.

तसेच कांद्याची साल केसांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी रामबाण उपाय म्हणून कार्य करते. जर आपण केस गळणे किंवा आपले कोरडे केस झटत असतील तर कांद्याची साल पाण्यात उकळा आणि शैम्पू नंतर आता या पाण्याने आपले केस धुवा. हे आपले केस  मजबूत बनवतेच, परंतु डोक्यातील कोंडाची समस्या देखील दूर करते.

मुली केसांना मुलायम आणि चमकदार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कंडीशनर वापरतात. पण कांद्याच्या सालीचा वापर करून तुम्ही केस मुलायम आणि चमकदार करू शकता. त्यासाठी केस धुताना कांद्याच्या सालीचा वापर करा.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठीही कांद्याच्या सालीचा वापर होतो. कांद्याच्या सालीमध्ये हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डागांपासून सुटका होते. गाल कोरडे झाल्यास कांद्याचा उपयोग केला जाऊ शकतो. कांद्याची साल गरम पाण्यात उकळून त्याचा वापर करा. याने गाल मुलायम होतील.


Posted

in

by

Tags: