खबरदार! जर आपण पण याप्रकारे शरीराच्या या भागांवर करत साबण, पावडर, शैम्पू, परफ्युमचा वापर तर आपल्याला होऊ शकतात कर्करोगासारखे भयंकर रोग

घरातून बाहेर पडताना दिवसभर सुगंधी राहावं म्हणून आपण परफ्युम लावतो. पण काहींना परफ्युमचे एवढे व्यसन असते की, ते सतत सुगंधी राहावे म्हणून अति परफ्युमचा वापर करतात. अशा कितीतरी लोकांना तुम्ही ओळखत असाल.

पण तुम्हाला माहीत आहे का? परफ्युमच्या अशा सतत वापरण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खोलवर होत असतो. परफ्युम वापरणे ही वाईट गोष्ट नसली तरी त्याच्या अतिवापराचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि एकूणच आरोग्यावर होतात. म्हणूनच आज जाणून घेऊया परफ्युम लावण्याचे दुष्परिणाम.

परफ्युमच्या अति लावण्याचे तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम कोणते ते आज आपण जाणून घेऊया. म्हणजे एखाद्या परफ्युमच्या वापरानंतर तुम्हाला त्रास झाला तर त्यावर काय इलाज करायचा हे समजू शकेल.

अस्वस्थपणा:-

जर तुम्ही परफ्युम नेहमी वापरत असाल आणि तुम्हाला ठराविक सेंट आवडत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला होत नाही. कारण दुकानात गेल्यानंतर परफ्युम निवडताना आपण असा सुगंध निवडतो जो तुम्हाला पटकन आवडतो. पण कधी कधी आपण एखादा नवा परफ्युम वापरल्यानंतर अचानक आपल्याला त्रास होऊ लागतो.

आता हा नवा परफ्युम कदाचित तुमच्या रोजच्या सवयीचा नसल्यामुळे आणि त्याचा सुगंध उग्र असल्यामुळे अचानक आपली तब्येत बिघडली असे आपल्याला वाटू लागते. परफ्युमच्या वापरामुळे होणारा हा दुष्परिणाम तुम्हाला ही जाणवू लागला की, तुम्ही लगेचच त्या सुगंधापासून थोडे लांब व्हा.

शरीरावर फोड येणे:-

परफ्युम हे लिक्विड आणि गॅस अशा दोन्ही रुपात मिळतात. पण गॅस फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याला डिओड्रंट स्प्रे असे म्हणतो. द्रव्य रुपात असेल तर त्याला परफ्युम असे म्हणतात. साधारणपणे काखेत, छातीवर आपण परफ्युम मोठ्या प्रमाणात लावतो. आपल्या शरीरावर अनेक छिद्र असतात तुमच्या घामाचे उत्सर्जनही त्यातून होत असते. तुमच्या छिद्रांमध्ये परफ्युम गेले तर त्यामुळे तुम्हाला पुळया येण्याची शक्यता असते.

अशा पुळ्यांमध्ये पू साचतो. अनेकदा तुम्हाला मोठ्या पुळ्या येत नाहीत. पण बारीक पुटकुळ्या येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे परफ्युमचा असाही त्रास तुम्हाला होऊ शकतो. ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असेल तर त्या व्यक्तीला हा त्रास होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते.

अंत:स्राव प्रणालीवर परिणाम:-

परफ्युममध्ये हमखास असणारी गोष्ट म्हणजे पॅराबिन पॅराबिन हे एक सिंथेटीक प्रिझरव्हेटिव्ह असून त्याचा थेट संबध तुमच्या अंत:स्रावी प्रणालीवर होतो. आपल्या शरीरातील हार्मोन्सवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या अंतर्गत आरोग्यासाठीही परफ्युम वापरणे धोक्याचे आहे. त्यामुळे परफ्युम वापरताना तुम्ही तो जपून वापरायला हवा.

प्रजननावरही होतो विपरित परिणाम:-

परफ्युमचा अत्यंत दूरगामी परिणाम प्रजननावर होतो. परफ्युममध्ये असते. जे बाळाच्या वाढीला अडथळा निर्माण करते. म्हणूनच गरोदरपणात महिलांना परफ्युम किंवा असे सेटेटंड द्रव्य लावण्याचा सल्ला गरोदर महिलांना दिला जात नाही. त्याचा अति वापर करत असाल तर तुमच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा परिणाम होतो.

श्वसनाचा होतो त्रास”-

परफ्युमचा आणखी एक त्रास तुमच्या श्वसनाशी निगडीत आहे. अनेकांना परफ्युमचा वास घेतल्यामुळे श्वसनासही अडथळा निर्माण होतो. तुमच्या फुफ्फुसांवर परफ्युमचा परिणाम झाल्यामुळे तुम्हाला अस्थमासारखे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर परफ्युमचा अतिरिक्त वापर टाळा.

ह्रदयाचे ठोके वाढवते:-

अनेकदा घाबरल्यानंतर आपल्या ह्रदयाचे ठोके वाढतात. पण परफ्युमच्या त्रासामुळेही तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. आपण लावलेलेच परफ्युम नाही तर इतर कोणीही परफ्युम लावले असेल तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो.

अनेकदा प्रकृती अस्थिर झाली की, हा त्रास आपल्याला होतो. आपल्या रक्तदाबावर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागतो. तुम्ही अस्वस्थ झाला किंवा घाबरलात की, आपसुकच ह्रदयाचे ठोके वाढू लागतात.

सुंगधी राहण्यासाठी तुम्ही परफ्युम निवडत असाल तर तुम्ही परफ्युमचा योग्य सुगंध निवडा. कामाचे स्वरुप, तुमची      त्वचा आणि पर्सनॅलिटी या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अगदी व्यवस्थित विचार करा.

परफ्युम कधीही तीव्र सुगंधाचे नसावे. तुम्हाला लाँग लास्टिंग सुगंध हवा म्हणून तो तीव्र असून चालत नाही. परफ्युममधील घटकही जाणून घेणे महत्वाचे असते.

परफ्युम माईल्ड आणि मंद सुगंध देणारे असावे. त्याच्या सुगंधाचा भपका दुसऱ्यांना त्रासदायक वाटू नये असा असावा.

परफ्युम तुमच्या त्वचेसाठी हानिकारक आहे की, नाही हे तपासण्यासाठी तुम्ही परफ्युमची पॅच टेस्ट घ्या.

परफ्युममुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते का?

अनेक अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे की, परफ्युमचे तुमच्या शरीरावर दूरगामी परिणाम होतात. त्यामध्ये असणाऱ्या घटकामुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅन्सर होण्याबाबतीत सांगितलेल्या शक्यता या खऱ्या आहेत. पण ठराविक एका परफ्युममुळेच तुम्हाला कॅन्सर होते असे सांगता येत नाही.

लहान मुलांसाठी परफ्युम चांगले नसते का?

परफ्युमचा वापर मोठ्यांवर इतका परिणाम करु शकते. त्याचे विपरित परिणाम लहान मुलांवर अगदी पटकन होऊ शकता. परफ्युममध्ये असलेले अल्होहल आणि सुंगधी द्रव्ये हे लहान मुलांसाठी मुळीच बनलेले नसतात. त्यामुळे लहान मुलांवर चुकूनही याचा वापर करु नये. त्या ऐवजी तुम्ही लहान मुलांसाठी फक्त बेबी पावडरचा उपयोग करा.


Posted

in

by

Tags: