काय आपण पण रोज गरम पाणी पिता…तर त्वरित सावध व्हा जसे त्याचे काही फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत…अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकता

काय आपण पण रोज गरम पाणी पिता…तर त्वरित सावध व्हा जसे त्याचे काही फायदे आहेत तसेच अनेक तोटे देखील आहेत…अनेक आजारांना निमंत्रण देऊ शकता

गरम पाणी पिण्याच्या फायद्यांविषयी सर्वांना माहिती आहे. वजन कमी होण्यापासून ते त्वचेपर्यंत गरम पाणी अनेक आरोग्याच्या समस्यांसाठी फायदेशीर ठरते. परंतु आपणास हे माहित आहे की गरम पाणी पिण्याचेही बरेच तोटे आहेत.

बर्‍याच लोकांना याची माहिती नसते आणि यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तथापि, असा काही वैज्ञानिक पुरावा नाही की गरम पाण्याचे फायदे आहेत. तसेच काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. चला जाणून घेऊया-

आयुर्वेदानुसार पाणी जास्त प्रमाणात गरम केल्याने त्यातील खनिजे नष्ट होतात आणि पाण्यातील पोटॅशियम उडून जाते. म्हणून ते आपल्या स्वास्थ्यासाठी हानिकारक आहे. यासह, जर हे पाणी सोलर सिस्टम आणि वॉटर कूलर्समधून येत असेल तर हे पाणी अत्यंत हानिकारक असू शकते.

जर पाणी दुषित असेल तर त्यात तुरटी फारवावी आणि नंतर गरम करुन थंड झाल्यावर प्या. गरम पाण्याऐवजी आपण ग्रीन टी पिऊ शकता. आयुर्वेदानुसार जास्त गरम पाणी पिणे हानिकारक आहे. लोक हवे असल्यास कोमट पाणी पिऊ शकतात.

कोमट पाणी पिण्याचा योग्य मार्गः

 • वजन कमी करण्यासाठी कोमट पाणी प्यावे.
  पाणी पिण्याने जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
  मेंदू ९० टक्के पाण्याने तयार झालेला असतो. कमी पाणी पिल्याने डोके दुखू शकते.
  पाण्याने ज्यॉइट्सचा त्रास कमी होतो.

 

 • शरीरातील मांसपेशींचा ८० टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. त्या मजबूत करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.
  सकाळी उठल्यानंतर १ ग्लास पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होते. त्वचा कोरडी पडत नाही.
  सकाळी उठल्यानंतर गरम अथवा कोमट पाण्यात मध आणि लिबू टाकून प्यावे. यामुळे टॉक्सिक एलिमेंट शरीरातून बाहेर पडतात. इम्यून सिस्टिम उत्तम राहते.

पाणी पिण्याचे १० तोटे:-

 • जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने फॅट वाढते.
  खरबूज, काकडी खाल्यानतर लगेच पाणी पिऊ नये. सर्दी होण्याची दाट शक्यता असते.
  जास्त पाणी पिल्याने जेवण पचण्यास उशीर लागू शकतो.
  काहींना पाणी पिल्याने जळजळ होण्याचा त्रास असतो.
 • उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नये.
  प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिल्याने किडनीवर अतिरिक्त दबाव पडू शकतो.
  पाण्याच्या अति सेवनामुळे हृदयाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
  बायपास झालेल्या व्यक्तींनी पाणी कमी प्यावे.
  रिकाम्या पोटी पाणी पिल्यास सर्दी-ताप होण्याची भिती असते.

Omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *