या ‘खलनायकांची’ बायको खूप सुंदर आहे, कुणी अभिनेत्री बरोबर लग्न केलं आहे तर कुणी राजकुमारीशी लग्न केलं आहे

या ‘खलनायकांची’ बायको खूप सुंदर आहे, कुणी अभिनेत्री बरोबर लग्न केलं आहे तर कुणी राजकुमारीशी लग्न केलं आहे

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जातात. या कलाकारांची नकारात्मक पात्रे लोकांना चांगलीच पसंत पडली आहेत आणि म्हणूनच हे सर्व खलनायक नायकांइतकेच प्रसिद्ध आहेत.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच काही खलनायकाची नावे सांगणार आहोत. जे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. इतकेच नाही तर यापैकी अनेक खलनायकांनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्न केले आहे. अर्थातच त्यांना चित्रपटांत नायिका सापडली नाही, परंतु खऱ्या जीवनात त्यांनी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीशी लग्न केले आहे.

डॅनी डेन्झोंगपा आणि गावा डेन्झोंगपा

डॅनी डेन्झोंगपा हे 90 च्या दशकाचे प्रसिद्ध खलनायक होते. त्याने खुपसाऱ्या चित्रपटांत जोरदार अभिनय केला आहे. त्याच वेळी त्याचा अभिनय पाहून सिक्किमची राजकन्या गवा डेन्झोंगपा हिला त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागले आणि गावा डेन्झोंगपाने त्यांच्याशी लग्न केले. या लग्नामुळे त्यांना दोन मुले आहेत.

केके मेनन आणि  निवेदिता भट्टाचार्य

केके मेननने बर्‍याच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. तर त्यांची पत्नी एक अभिनेत्री आहे. केके मेनन यांची पत्नी निवेदिता भट्टाचार्य मोठ्या आणि छोट्या पडद्यावर काम करत आहेत. निवेदिता भट्टाचार्य आणि केके मेनन एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते आणि त्यांनी एकत्र आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली.

निकितन धीर आणि कृतिका  सेंगर

दिग्दर्शक पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर यांनी बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपटांमध्ये बरीच कामे केली आहेत. तो त्याच्या नकारात्मक पात्रासाठी ओळखला जातो.

त्याचवेळी त्यांच्या पत्नीचे नाव कृतिका सेंगर आहे, ज्यांनी ‘राणी लक्ष्मीबाई’ आणि ‘कसम तेरे प्यार की’ सारख्या अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे. निकितन धीरने ‘मिशन इस्तंबूल’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘दबंग 2’ आणि ‘रेडी’ अशा बर्‍याच चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. २०१४ साली या दोघांचे लग्न झाले.

सोनू सूद आणि सोनाली

आज सोनू सूद आपल्या उदात्त कार्यांसाठी प्रसिद्ध आहेत. पण त्याआधी त्यांची ओळख खलनायक अभिनेता म्हणून झाली होती. वास्तविक, सोनू सूदने बर्‍याच चित्रपटात नकारात्मक पात्र साकारले आहे. बॉलिवूड व्यतिरिक्त त्याने दक्षिण चित्रपटांमध्येही नकारात्मक भूमिका केल्या आहेत. सोनू सूदने १९९६ मध्ये सोनालीशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत.

परेश रावल आणि स्वरूप संपत

परेश रावल जेव्हा बॉलिवूड चित्रपटांत काम करू लागले, तेव्हा त्यांना फक्त नकारात्मक पात्रं यायची. त्याने ही पात्रं खूपच चांगल्या प्रकारे निभावली आणि थोड्याच वेळात तो खूप प्रसिद्ध झाला.

परेश रावलचे माजी मिस इंडिया स्वरूप संपतशी लग्न झाले आहे. या लग्नापासून त्याला दोन मुलगे आहेत. परेश रावल यांची पत्नी स्वरूप संपतही बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली आहे.

गुलशन ग्रोव्हर आणि काशिश ग्रोव्हर

गुलशन ग्रोव्हर हा बॉलिवूडचा एक ख्यात खलनायक आहे आणि जवळजवळ प्रत्येक चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. गुलशन ग्रोव्हचे आयुष्यात दोन विवाह झाले आहेत. त्यांचे पहिले लग्न अवघ्या दोन वर्षातच तुटले. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर त्यांनी २००१  साली काशिश ग्रोव्हरशी लग्न केले.

शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे

शक्ती कपूरने बर्‍याच चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. मात्र, खलनायकाशिवाय तो एक विनोदी भूमिकेतही दिसला आहे. शिवांगी कोल्हापुरे असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. शिवांगी कोल्हापुरे यांनी बर्‍याच चित्रपटात काम केले आहे. दोघांनाही एकूण दोन मुलं आहेत.

रेणुका शहाणे और आशुतोष राणा

आशुतोष राणा आपल्या नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जातात. त्याने ‘दुश्मन’, ‘संघर्ष’, ‘बादल’ यासारख्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे आणि या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या त्यांच्या पात्रांना आजही लोकांच्या आठवणी आहेत.

आशुतोष राणा यांची पत्नी अभिनेत्री रेणुका शहाणे आहे. हम आपके हैं कौन या सिनेमात दिसली अभिनेत्री रेणुका शहाणे हिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आणि २०११ मध्ये आशुतोष राणाशी त्यांनि लग्न केले.

पूजा बत्रा आणि नवाब शाह

नवाब शाह एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्याने आपल्या नकारात्मक पात्राने लोकांची मने जिंकली आहेत. नवाब शाहने अभिनेत्री पूजा बत्राशी लग्न कले आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले. पूजा बत्रा 90 व्या शतकाची प्रसिद्ध अभिनेत्री असायची.

पोनी वर्मा आणि प्रकाश राज

पोनी वर्मा हे नृत्यदिग्दर्शक आहेत आणि त्यांनी 2010 मध्ये प्रकाश राजसोबत लग्न केले. प्रकाश राजने बॉलिवूड व्यतिरिक्त दक्षिण चित्रपटांमध्येही काम केले आहे. तो खलनायकाच्या भूमिकेत ‘सिंघम’, ‘वांटेड’, ‘दबंग 2’ यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *