जाणून घ्या मखाणे खाण्याचे आरोग्यदायी असे फायदे…सांधेदुखी असो वा उच्च रक्तदाब…करा फक्त त्याचे याप्रकारे सेवन…परिणाम समोर असतील

मखाना म्हणजे फुल्ल टाईमपास आणि पौष्टिक खाद्य, पॉपकोर्न सारखं! मराठीत मखाना म्हणजे कमळाचे बीज, पण याला जगभरात मखानाच बोलत असल्याने आणि आपल्यालाही तोच शब्द माहित असल्याने आपणही इथे याला मखाना असंच बोलू. हा मखाना ज्यांना सारखी भूक लागते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे,कारण हा भूक सुद्धा भागवतो आणि शरीरावर दुष्परिणाम सुद्धा करत नाही.

त्यामुळे मखाना तुम्ही जास्त खाल्लं तरी काही नो टेन्शन! तुम्हालाही याचा आरोग्याला फायदा होतो हे माहित असेल, पण काय फायदा होतो हे माहित आहे का? नाही ना? चला तर आज जाणून घेऊया मखाना खाण्याचे सगळे फायदे, म्हणजे तुम्ही सुद्धा अधिक आवडीने बिनधास्त मखाना खाऊन स्वत:ला फिट ठेवू शकता.

कसे वापरावे:-

भारतात माखाणांचा वापर बहुधा पूजामध्ये केला जातो. तसे, हे आरोग्यासाठी देखील खूपच निरोगी आहे कारण त्यात प्रथिने, कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मखाणा कच्चा, भाजलेला किंवा खिरीबरोबर बनवता येतो. चला जाणून घेऊया, मखाणा खाण्याचे काही फायदे…

मधुमेह नियंत्रित राहतो:-

मधुमेहाचे रुग्ण सुद्धा मखानाचे सेवन करू शकतात. काय आश्चर्य वाटतंय? पण हे अगदी खरं आहे. एका वैज्ञानिक संशोधनानुसार हे दिसून आलेलं आहे की मखाना मध्ये कमी ग्लाईसेमिक इंडेक्स असतं.

हा एक असा गुण आहे जो मधुमेहामुळे होणारा धोका कमी करण्यासाठी सक्रीय रुपात मदत करतो. त्यामुळे जर तुमच्या घरी व ओळखीमध्ये कोणी मधुमेहाचा रोगी असेल तर त्याला मखाना खाण्याचा सल्ला नक्की द्या. मखाना खाण्यास सुरुवात करताच त्यांना फरक नक्की दिसून येईल आणि ते तुमच्या या टिप्सने इम्प्रेस सुद्धा होतील. गर्लफ्रेण्डच्या वडिलांना किंवा

हृदय निरोगी राहते:-

माखाना हा कमी फॅटचा स्नॅक आहे, त्यामुळे तो शरीराच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवत नाही आणि रक्त प्रवाह योग्य राहतो. म्हणून, हृदय निरोगी ठेवल्यास हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी होतो.

पाचक प्रणाली मजबूत आहे

रोज मखानेचे सेवन केले तर शरीराला थंडपणा मिळतो. मखाने नेहमी साजूक तुपावर भाजून खावे. किडनीचे कार्य नेहमी चांगले राहते.
ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहते. चक्कर, भीती व अशक्तपणा ह्या समस्या दूर होतात. दुधाबरोबर ह्याचे सेवन केले तर डोके शांत राहते. तसेच भूक पण लागते. पचनशक्ती सुधारते.

ताण कमी होतो

काही जणांना रात्री झोप येत नाही. त्यानी रात्री झोपताना गरम दुधा बरोबर मखानेचे सेवन केले तर निद्रानाश दूर होतो. ह्यामध्ये एंटीऑक्सीडेंट्सचे गुण आहेत. व आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते.

रक्तदाब नियंत्रण:-

ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी नियमित रूपाने मखाना खायला हवं. मखाना खाल्ल्याने केवळ त्यांचा रक्तदाबच संतुलित राहणार नाहीये तर उच्च रक्तदाबामुळे शरीराला होणारे अपाय सुद्धा रोखले जातात.

मखाना यावर इतका गुणकारी कसा? तर मखाना मध्ये मॅग्नीशियमचे प्रमाण जास्त असते. हे एक असं खनिज आहे जे रक्तदाबाला संतुलित ठेवण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. म्हणूनच रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांना मखाना हे एकप्रकारे वरदान ठरतं.

सांधेदुखीपासून आराम:-

बरेच लोक सांधेदुखीने त्रस्त असतात, अशा लोकांनी मखाणे त्यांच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. मखानामुळे सांधेदुखी आणि शरीराची वेदना नाहीशी होते. वृद्ध लोकांना दिवसातून दोन वेळा मखाना खाण्याचा सल्ला दिला जातो. हे यासाठी सांगितलं जातं कारण यात कॅल्शीयमची मात्रा मुबलक प्रमाणात असते.

कॅल्शीयम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचे काम करतं. आता वृद्धांना इतका फायदा होतो तर तरुण वर्गाला सुद्धा होणारंच कि. तरुण वर्गाची हाडं आधीच बळकट असतात तर मखाना खाल्ल्याने ती हाडं अधिक बळकट होतात. म्हणून तरुणांनी सुद्धा मखाना खायला हवा.

चरबी कमी होते:-

तसेच जर आपण लठ्ठपणामुळे त्रस्त असाल तर तुमच्यासाठी मखाणा हा रामबाण उपायापेक्षा काहीच कमी नाही. याचे कारण कि यामध्ये चरबी आणि साखरेचे प्रमाण खूप कमी आहे. म्हणून, लठ्ठपणामुळे ग्रस्त लोक मखाणे त्यांच्या आहारात स्नॅक म्हणून समाविष्ट करू शकतात.

रक्त:-

ज्याच्या शरीरात रक्ताची कमी असते आणि त्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो त्यांनी तर मखाना नक्कीच खायला हवा. मखाना मध्ये विपुल मात्रामध्ये लोह असते. जे कि तुमच्या रक्ताच्या कमतरतेला भरून काढतं. डॉक्टर सुद्धा कमी रक्त असलेल्यांना लोह अधिक असणारे पदार्थ खाण्यास सुचवतात.

लोह असलेले सगळेच पदार्थ चांगल्या चवीचे असतात असं नाही, म्हणून ज्यांच्या शरीरात रक्त कमी आहे आणि त्यांना तोंडाला चव देणारा पदार्थ खाण्यासोबत लोह देखील हवं असले त्यांनी आवर्जून मखाना खायला सुरुवात करा. म्हणजे मन पण भरेल आणि शरीरात लोह पण भरेल.

चमकत्या त्वचेसाठी मखाणे खा

मखाना खाण्याचा हा सगळ्यात मोठा फायदा, जे लोक मखाना खातात त्यांच्या शरीरात मखाना द्वारे जास्त प्रमाणात अँटीऑक्सीडेंट वाढते. हे यामुळे शक्य होते कारण एका वैज्ञानिक संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की मखाना मध्ये अँटीऑक्सीडेंटची मात्र मुबलक प्रमाणात असते. अँटीऑक्सीडेंट हा शरीराला आवश्यक असणारा अति महत्त्वाचा घटक आहे.

अँटीऑक्सीडेंट मुख्यत: आपल्या शरीराची त्वचा उजळवण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती अधिक बळकट करण्यास मदत करतात. तर मंडळी एवढे सगळे फायदे आता माहित झाले असूनही तुम्ही मखाना न खाण्याची चूक करू नका. मखाना आवर्जून खा आणि आपल्या शरीराला अधिक बळकट व निरोगी बनवा.


Posted

in

by

Tags: