त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी मदत करतो कांद्याचा रस…आजचं करा या प्रकारे कांद्याचा वापर…परिणाम आपल्या समोर असतील

अनेक लोकांना कांद्याचे सौंदर्यासाठीचे फायदे माहीतच नसतात. परंतु कांदा हा त्वचेसाठी आणि केसांसाठी फार उपयोगी ठरतो. मग तुम्ही कोणत्याही स्वरूपात वापरा, त्वचेसाठी तो उपयोगीच ठरतो. अनेकदा आपण त्वचेच्या आणि केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करतो.

यामुळे अनेक साइडइफेक्टसचा सामना करावा लागतो. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करणं फायदेशीर ठरतं. कांदा किंवा कांद्याचा रस त्वचेच्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय ठरतो. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे केसांसोबतच त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया कांद्याच्या रसाचे त्वचेसाठी उपयुक्त फायदे…

अनेकदा चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कालांतराने नाहीसे होतात पण त्यांचे डाग तसेच राहतात. या डागांवर तुम्ही जर कांद्याच्या रसामध्ये लिंबाचा रस किंवा दही एकत्र करून लावलं तर चेहऱ्यावरील काळपटपणा आणि काळे डाग दूर होण्यास मदत होते. त्यासाठी एक चमचा कांद्याचा रस, एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. साधारणतः 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवून टाका. डाग नाहीसे होण्यास मदत होईल.

कांदा आणि ऑलिव ऑयल:-

अनेकांच्या चेहऱ्यावर मोस किंवा चामखीळ तुम्ही पाहिली असेल. काहींच्या अंगावर तर इतके चामखिळ असतात की, ते त्यामुळे वैतागलेले असतात. कारण त्यामुळे त्यांच्या सौंदर्यात अडथळा निर्माण होत असतो.

अशात अनेकजण या चामखीळ शरीरावरून हटवण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. पण त्याऐवजी तुम्ही कांद्याचा रस वापरू शकता. यासाठी ताजी तुळशीची पानं आणि कांद्याची पेस्ट चामखीळ असेलेल्या ठिकाणी लावून तीन तासांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. असं केल्याने चामखीळ हळूहूळ निघून जाईल.

पिंपल्सपासून सुटका:-

प्रत्येकजण सुंदर दिसण्यासाठी सतत प्रयत्नशील असतं. तसेच सौंदर्य आणखी वाढविण्यासाठी अनेकजण सतत काहीना काही उपाय करत असतात. अनेक तरूण-तरूणींना नेहमीच चेहऱ्यावरील पिंपल्सचा सामना करावा लागतो.

पिंपल्स येणाची अनेक कारणं असतात. प्रदुषण, शरीरात होणारे बदल, धूळ, घाण, तेलकट पदार्थांचे जास्त सेवन ही कारणंही चेहऱ्यावर पिंपल्स येणासाठी जबाबदार ठरतात. त्वचेची व्यवस्थित काळजी न घेणं आणि केसांकडे केलेल्या दुर्लक्षामुळेही पिंपल्स येऊ शकतात. यावरही कांद्याचा रस गुणकारी ठरतो. कांद्याच्या रसामध्ये ऑलिव्ह ऑइल एकत्र करून पिंपल्सवर लावा. नियमितपणे असं केल्याने पिंपल्स दूर होण्यास मदत होते.

रक्त पातळ करण्याचे गुणधर्म:-

पांढऱ्या कांद्यातील औषधी गुणधर्मांमुळे रक्त पातळ होण्यासही मदत मिळते. यामधील फ्लेव्होनॉइड आणि सल्फर शरीरातील रक्त पातळ करण्यास मदत करतात. रक्त पातळ करणारे एजंट किंवा ब्लड थिनर शरीराच्या नसांमध्ये (रक्तवाहिन्या आणि नसा) रक्तप्रवाह सुरळीत सुरू ठेवण्याचे कार्य करतात.

केसांच्या आरोग्यासाठी:-

केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी पांढऱ्या कांद्याचा रस एक रामबाण घरगुती उपाय मानला जातो. या रसामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते. तसंच कोंड्याची समस्याही कमी होते.


Posted

in

by

Tags: