जर आपल्याला सुद्धा असेल कानदुखी किंवा कानाचा कोणताही आजार…तर आजचं करा हे घरगुती उपाय…आपली समस्या नाहीशी झालीच समजा

शरीरात पाच प्रमुख  अवयवांच्या मध्ये कान हा महत्वाचा अवयव आहे. मानवाच्या शरीरात  कोणत्या ना कोणत्या अवयवाविषयी समस्या असतात. सध्या च्या विज्ञान युगात अत्याधुनिक यंत्राचा अमाप वापर केल्याने व सार्वजनिक  ठिकाणी नको असलेल्या ध्वनीचा त्रास आपल्या कानाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे होतो. कर्णदोष किंवा कान दुखणे देखील त्याचाच एक भाग मानला जातो. त्याचबरोबर वाढत्या वयात कानाचें विकार सुरु होणे स्वाभाविकच आहे.

परंतु तरुण पिढी ज्या पध्दतीने हेडफोन व रॉक संगीत ऐकण्यासाठी डॉल्बी चा मोठया प्रमाणात वापर करत आहेत, त्यामुळे सुध्दा कानाचे विकार वाढल्याचे निदर्शनात आले आहे. आपण काही घरगुती उपाय करुन आपल्या कानाची काळजी घेऊ शकतो.असेच काही कान दुखणे घरगुती उपाय आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

कान दुखणे काय आहे? लक्षणे कोणती आहेत.

कान दुखणे, ज्याला कानदुखी म्हणून देखील संबोधले जाते, हे विविध वैदयकिय  परिस्थीचे एक सामान्य लक्षण आहे. याचा  परिणाम  कोणालाही, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो.  बहुतांश घटनांमध्ये वेदना, गंभीर सूचक नाही आहेत, पण तीव्र वेदनांचा तपास करणे आवश्यक आहे.

बदलणारा वायु दाब कान दुखीचे एक प्रमुख कारण होऊ शकते. उदा. विमानातून प्रवास करतांना अनेक प्रवाशांची कान दुखण्याची समस्या आपण ऐकली असेल. मुळात उडडाणा दरम्यान आपल्या कानांना एक नवीन अनुभव येत असतो, म्हणून आपल्या कानाच्या स्नायु ना जास्त त्रास जाणवतो.

कधी कधी पोहताना किंवा आंघोळ करताना कानात पाणी गेल्यामुळे, किंवा कानात घाण जमा झाल्यामुळे कानदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे ऐकू कमी येते, डोके दुखू लागते. थंड वातावरणात किंवा थंडीच्या दिवसात कानदुखीचा त्रास अधिक जाणवतो.

तुळशीचा रस:-

तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुण असतात. तुळशीच्या पानांचा रस कानामध्ये घातल्याने आपल्याला आराम मिळतो. त्यासाठी तुळशीची पाने बारीक चिरून घ्या व त्याचा रस काढा. हा रस गरम करा आणि कपाशीच्या मदतीने कानात घाला. कानात तुळशीचा रस टाकल्यास कानात विषाणू आणि विषाणूचे संक्रमण दूर होते.

लसणाचे तेल:-

लसणाचे तेल तुम्ही कानात घालायला ड्रॉप म्हणून देखील वापरू शकता. घरच्या घरी लसूण तेल तयार करण्यासाठी किमान ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या आणि त्या एक चमचा तिळ आणि राई च्या तेलामध्ये गरम करा. लसणाचा रंग बदलल्या नंतर गरम करणे थांबवा. आता हे लसणाचा अर्क उतरलेले तेल थोडे गार होऊद्या,आणि कोमट झाल्यानंतर कापसाच्या  बोळ्याच्या सहाय्याने २ ते ३ थेंब कानात टाका.

कान दुखत असताना साधारण दिवसभरात २ वेळा असे केल्याने तुम्हाला नक्की आराम मिळेल.

कांद्याचा रस:-

जर कशाच्या इंफेक्शनमुळे तुमचा कान दुखत असेल तर यावर कांद्याचा रस हा अतिशय उपयुक्त उपाय ठरु शकतो.सुरवातीला कांद्याचा रस काढून घ्या त्यानंतर तो कोमट गरम करा आणि त्याचे २ थेंब कानात घाला. हा उपाय केल्याने देखील कान दुखीवर त्वरित आराम मिळेल.

कडुलिंबाचा रस:-

जर आपल्यास विषाणूच्या संसर्गामुळे कान दुखत असेल तर कडुनिंबाचा रस कानात घाला. कडुलिंबाचा रस कानात टाकून वेदना दूर होईल. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यांचा रस काढा. नंतर हा रस हलका गरम करून कापसाच्या मदतीने कानात घाला. दिवसातुन तीन वेळा हा रस कानात घालल्यास त्वरित आराम मिळतो.

ऑलिव तेल:-

जर अचानक कान दुखायला लागला आणि घरात कानात घालण्यासाठी ड्रॉप उपलब्ध नसेल तर तुम्ही घरात असणारे खोबरेल तेल वापरुन कानाच्या बाहेरील बाजूने कॅनची मसाज करू शकता. कानाच्या सर्व बाजूंनी तेल लाऊन मसाज केल्याने देखील तात्पुरता का होईना पण आराम मिळेल.

गरम कापडाने कानाला शेक द्या

रात्री अपरात्री अचानक कान दुखायला लागल्यास अनेकदा गरम पाण्याच्या पिशवीने देखील कान शेकला तरी आराम पडतो. घरात जर गरम पाण्याची पिशवी किंवा हॉट पॅड नसेल तर काळजी करू नका. सरळ तवा गॅस वर गरम करा आणि त्यावर एखादे सुती कापड गरम करून घ्या.गरम झालेल्या कापडाच्या सहाय्याने तुम्ही तुमचे कान शेकु शकता. या गोष्टी मुळे देखील कान दुखी वर आराम मिळतो.

कान दुखी वरील डॉक्टरांचे काही सल्ले / उपाय

कान दुखीची जी काही लक्षणे आहेत जसे की कांनातून पाणी येणे,किंवा अचानक पणे कान प्रकर्षाने दुखणे. जर आपल्याला उपरोक्त रेखांकित लक्षणापैकी काही लक्षणांचा अनुभव येत असेल तर आपण डॉक्टरकडे जावे. प्रभावी निदानासाठी, डॉक्टर कानातून काही द्रव्य  पदार्थांचे नमुने तपासू शकतात. संसर्गाच्या किंवा वेदनांच्या तीव्रतेवर आधारीत, कान दुखणे दूर करण्यासाठी  डॉक्टर विविध उपाय सुचवू शकतात.  त्यापैकी काही असे आहेत.

काही  वेळा कानदुखी ही विषाणूमुळे येते. पण ती वेगळी ओळखता येत नाही, म्हणून ५ दिवस कोझाल व मेझोल जंतुविरोधी गोळया घाव्यात. या व्यतिरिक्त ऍसपिरीन किंवा पॅमाल दया.

दिवसातून चार किंवा पाच वेळा कानात जंतुनाशक थेंब टाका.

कोरडया स्वच्छ कापसाने कानातला पू दर दोन – तीन तासांनी टिपून घ्या. कापसाचा बोळा ठेवून तो  भीजला की काढून नवा बसवणे हा सोपा मार्ग आहे. नळीने पू शोषून घेता आले तर जास्त चांगले, यासाठी सलाईनच्या नळीचा भाग कापून वापर करता येईल.


Posted

in

by

Tags: