आपल्याला पण झोप येत नसेल तसेच तणाव असेल तसेच हे लक्षणे असतील तर त्वरित व्हा सावध… अन्यथा आपल्याला अल्झायमर झालाच समजा

अल्झायमर विकारात खूप यातना दडल्या आहेत. अल्झायमर डिसीज म्हणजे काय, तो कोणी शोधून काढला, त्याची लक्षणे काय असतात, काय काळजी घ्यावी लागते, होऊ नये म्हणून काही उपाय करणे शक्य आहे का, आधुनिक वैद्यक शास्त्र ह्या विषयी काय सांगते अल्झायमर डिसीजबद्द्ल आयुर्वेदाचा दृष्टिकोन काय आहे ह्या विषयी जाणून घेऊ या.

प्रतीकात्मक चित्र

अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने १९०६ साली ह्या आजाराचा शोध लावला. त्यामुळे ह्याला अल्झायमर डिसीज नाव देण्यात आले. मेंदूतील पेशींची विचित्र गुंतागुंत आणि चमत्कारिक गुठळ्या अशा अवस्थेत एका मृत स्त्रीचा मेंदू त्याने अभ्यासला. स्मरणशक्तीच्या विचित्र लक्षणांमुळे तिचा मृत्यु झाला होता.

त्या लक्षणांचा संबंध तिच्या मेंदूच्या रचनेशी असल्याचा तर्क करणारा हा जगातील पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखला गेला. अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर अल्झायमर डिसीज म्हणजे विसरभोळेपणा वाढत जातो.

पहिले पहिले नाव विसरणे नंतर नाती विसरणे, जेवण खाणे विसरणे अशाप्रकारे लक्षणांमध्ये वाढ होत जाते. सुरुवातीला घरातल्या इतरांना हा अगदी थट्टा मस्करीचा विषय होतो. रोगाचे गांभीर्य कळू लागले की डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागते.

वास्तविक तेव्हा फार उशीर झालेला असतो. कारण अल्झेमर्सची सुरुवात मेंदूमध्ये झाल्यानंतर जवळपास दहा वर्ष उलटल्यानंतर मगच सुरुवातीची लक्षणे दिसू लागतात असा शास्त्रज्ञांचा अभ्यास आहे. ६५ वर्षे वया नंतर शेकडा २० टक्के लोकांमध्ये अल्झायमर होण्याची शक्यता असते असा निष्कर्ष अभ्यासातून काढला गेला आहे.

प्रतीकात्मक चित्र

अल्झायमर आजार होण्याची कारणे:-

अल्झायमर हा रोग कशामुळे होतो याचे निश्चित असे कारण शोधण्यात अद्यापही यश आले नाही. मात्र काही मेंदूरोग तज्ज्ञांच्या मतानुसार, मेंदूतील काही पेशीं ह्या वाढत्या वयाबरोबर मृत होत जातात व त्यामुळे मेंदूला काही सिग्नल पोहोचण्यास बाधा निर्माण होते यामुळे अलझायमरची स्थिती वयस्कर व्यक्तींमध्ये उद्भवते.

याशिवाय अल्झायमर होण्यासाठी अनुवंशिकताही कारणीभूत ठरू शकते. जर आपल्या कुटुंबात हा कोणालातरी अल्झायमर विकार झाल्याचा इतिहास असल्यास, आपल्याला हा रोग होण्याचीही अधिक शक्यता असते.

प्रतीकात्मक चित्र

अल्झायमर आजार होण्याचा जास्त धोका कोणाला असतो..?

वयाच्या 65 वर्षानंतरच्या व्यक्ती, कुटुंबात अल्झायमरचा अनुवंशिक इतिहास असणाऱ्या व्यक्ती यांना अल्झायमर होण्याची शक्यता जास्त असते. तसेच पुरुषांपेक्षा महिलांना हा विकार होण्याचा धोका जास्त असतो.

याशिवाय मधुमेह, ह्रदय रोग, उच्च रक्तदाब, बॅड कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण, लठ्ठपणा आणि डोक्याला दुखापत झालेल्या व्यक्तींना उतारवयात अल्झायमर होण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो.

लक्षणे:-

अल्झायमरच्या रोगाची लक्षणे हळूहळू वाढतात आणि जर त्यावर कोणतेही उपचार किंवा काळजी घेतली जात नसल्यास अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक पेशंटमध्ये खालील लक्षणे या आजारात प्रामुख्याने दिसून येतात.
विसराळूपणा, स्मरणशक्ती कमजोर होणे.
अलीकडील घडलेल्या घटनाही विसरून जाणे. स्वतःचे नाव किंवा पत्ताही विसरून जाणे.
कोणत्याही गोष्टीवर निर्णय घेता न येणे.
‎योग्यरित्या बोलू शकत नाही.
वेळ आणि ठिकानाबद्दल गोंधळ उडतो.
जवळच्या लोकांनाही ओळखता येत नाही.
दररोजची कामे करण्यास जसे, कपडे घालणे, अंघोळ करणे, ड्रायव्हिंग करणे, पैशांचा व्यवहार करणे किंवा स्वयंपाक करणे यासारखी दररोजची कामे करताना अडचणी निर्माण होणे.
डिप्रेशन आणि तणावाखाली वावरणे.
झोप न लागणे यासारखी लक्षणे दिसून येतात.


Posted

in

by

Tags: