जाणून घ्या पनीर खाण्याचे फायदे…आपल्याला राहायचे असेल सदैव निरोगी…तर याप्रकारे करा पनीरचे सेवन

जाणून घ्या पनीर खाण्याचे फायदे…आपल्याला राहायचे असेल सदैव निरोगी…तर याप्रकारे करा पनीरचे सेवन

पनीर हा पदार्थ सगळ्यांच्या घरी आवर्जून खाल्ला जातो. दुधापासून तयार करण्यात आलेलं पनीर अत्यंत पौष्टीक असतं. यात फॅट्स पण असतात. अशावेळी आपल्या आहारात पनीरचा योग्य पद्धतीनं वापर कसा करावा. हे माहिती असणं आवश्यक आहे. पनीरमुळे प्रथिनं मिळतात. पनीरमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक सुद्धा चांगल्या प्रमाणात असतं.

पनीर खाणं सर्वांसाठी आरोग्यदायी असतं.  तसेच ज्या लोकांच्या शरीरात यूरिक ओसिडचे प्रमाण  वाढलेलं असतं, त्यांना प्रोटीन न खाण्याचा सल्ला दिला जातो. जे नियमीत व्यायाम करतात त्यांनी पनीर खाणं गरजेचे असतं. मात्र ते कधी आणि किती प्रमाणात खायला हवं, तर जाणून घ्या पनीर किती आणि कधी खावं.

सांकेतिक तस्वीर

पनीरमध्ये योग्य प्रमाणात फायबर देखील आढळतात जे आपले पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांनी पनीर खाल्ले पाहिजे कारण पनीरमध्ये ओमेगा 3 आढळतो, जे मधुमेहाच्या रूग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. प्रथिने आणि कॅल्शियम व्यतिरिक्त पनीरमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, जस्त आणि सेलेनियम सारख्या खनिज असतात.

सांकेतिक तस्वीर

पनीर मध्ये कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात आढळते. जे अशक्तपणा असलेल्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. पनीर बर्‍याच पोषक तत्वांचा भांडार असल्याने गर्भवती महिलांसाठीही हे खूप फायदेशीर आहे. पनीरमध्ये आढळणारे कॅल्शियम गर्भवती महिलांसाठी फायदेशीर ठरते. पनीर बाळाच्या वाढीस मदत करते.

सांकेतिक तस्वीर

पनीरमध्ये आढळणारे घटक आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. पनीर नियमितपणे खाल्ल्यास पाचन शक्ती अधिक चांगली बनते. वजन वाढविण्यात पनीर देखील खूप फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरात रक्ताची पातळी सुधारते यासह, ज्यांचे हिमोग्लिबिनचे प्रमाण कमी आहे त्यानी आवर्जुन पनीर खाल्ला पाहिजे. पनीर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.

सांकेतिक तस्वीर

दात आणि हाडे: पनीरचा सर्वोत्तम फायदा म्हणजे याने तुमचे हाड आणि दात मजबुत होतात. त्याच बरोबर पनीर कॅल्शियम आणि फॉस्फरसाचा एक चांगला श्रोत देखील आहे. हाडे,वेदना आणि दातात होणारी समस्या दूर करण्यासाठी दररोज पनीरचा वापर करणे अत्यंत उपयुक्त आहे. मधुमेह: ओमेगा-3 ने समृध्द पनीर मधुमेहासाठी उपयुक्त आहे.

तज्ञ डॉक्टर त्यांच्या मधुमेही रुग्णांना रोज आहारात पनीरचे सेवन करण्याचे सल्ला देतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पनीर दोन्ही प्रकारच्या मधुमेहासाठी फायदेशीर आहे.

सांकेतिक तस्वीर

चरबी कमी होण्यास उपयुक्त प्रथिने आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक असिड नामक फॅटी असिड असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.  नुकतेच झालेल्या संशोधनाने हे.

सिद्ध झाले आहे की पनीरामध्ये कर्करोगाची जोखीम कमी करण्याची क्षमता आहे. पनीर पोटाचा कर्करोग, कोलन कर्करोग आणि स्तन कर्करोगाच्या उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

Omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *