हृदयरोग, वाढते वजन, रक्तदाब, सांधेदुखी, हाडांचा त्रास असा कोणताही त्रास असो फक्त गरम पाण्यासोबत याप्रकारे करा लसणाचे फायदे…परिणाम बघून आपले सुद्धा होश उडतील

स्वयंपाकाची चव वाढावी, यासाठी फोडणीमध्ये लसणाचाही वापर केला जातो. लसणामुळे अन्नपदार्थ चविष्ट होण्यास मदत मिळते. लसूणमध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. यातील पोषक घटकांमुळे कित्येक आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक औषध म्हणून ओळखलं जातं.

यामुळे आपल्या आहारामध्ये लसणाचा समावेश करावा. पण सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं तुमच्या शरीराला सर्वाधिक लाभ मिळतात. निरोगी आरोग्य हवे असल्यास सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यासोबत कच्चे लसूण खावे, यामुळे तुम्हाला भरपूर फायदे मिळतील.

लसूणमध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी- बॅक्टेरिअल, अँटी – फंगल आणि अँटी – व्हायरल हे गुणधर्म आहेत. लसूण खाल्ल्यानं आरोग्याला मिळणारे फायद्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे

वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारामध्ये लसणचा समावेश करा. यामध्ये अँटी-ओबेसिटी  गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात.

यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. लसूणच्या तेलामध्येही अँटी ओबेसिटी घटक असतात, जे वजन घटवण्यासाठी अतिशय प्रभावी ठरू शकतं. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्यानं शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँटी डायबेटीकचे गुणधर्म आहेत. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे.

एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील शर्करा नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉल ची पातळी देखील संतुलित राहते.

सर्दी-खोकला, तापाचा त्रास झाल्यानंतर आपली आई किंवा आजी आपल्याला घरगुती उपाय म्हणून लसूण खाण्याचा सल्ला देते. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असल्यास आपले गंभीर आजारांपासून संरक्षण होते.

मुरुमांच्या समस्यामुळे हैराण असाल तर लसूण खाणे अतिशय फायदेशीर ठरेल. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येते. लसूणमधील अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म त्वचेसाठी पोषक आहेत.

– तोंडाला येणारी दुर्गंधी देखील लसूणमुळे कमी होण्यास मदत मिळते. यावर उपाय म्हणून तुम्ही माउथ फ्रेशनर म्हणून तुम्ही लसूणचा वापर करू शकता.

लसूणमुळे पोट आणि आतड्यांचे  आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. यातील औषधी गुणधर्मामुळे पोटातील लहान आतड्यांचे नुकसान होत नाही. अँटी मायक्रोबिअल  गुणधर्म लहान आतड्यांचे हानिकारक बॅक्टेरियांपासून संरक्षण करते. पण लसूणचे अति प्रमाणात सेवन केल्यास छातीत जळजळ किंवा पोटाच्या समस्या निर्माण होऊ सकतात.

गर्भावस्थेत सुरुवातीच्या काही दिवसांत लसूणचे सेवन करू शकता. गर्भवती महिला आणि पोटातील बाळासाठी लसूण खाणे फायदेशीर असते. पण लसूणचे सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण प्रत्येक महिलेला लसूण खाणे फायदेशीर ठरेलच, असे नाही.

यकृतामध्ये सूज येणे किंवा यकृताशी संबंधित कोणत्याही आजारांपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास मर्यादित प्रमाणात लसूणचे सेवन करावे. काही जणांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा त्रास असतो, यावर उपाय म्हणून तुम्ही लसूण खाऊ शकता. पण समस्या गंभीर असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. कोणतेही दुखणे अंगावर काढू नका.

तसेच हाडे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण खावे. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिस यासारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त लसूणमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होत नाही. जी लोक दम्यामुळे हैराण आहेत, त्यांच्यासाठीही लसूण खाणे फायदेशीर ठरू शकतं


Posted

in

by

Tags: