अति गरम तसेच अति प्रमाणत चहा सेवन करणाऱ्या लोकांनी त्वरित व्हा सावध…उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या

चहा प्यायल्याशिवाय काही जणांच्या दिवसाची सुरुवात होणे अशक्यच असते. जोपर्यंत गरम चहाचे घोट पोटात जात नाही, तोपर्यंत कोणत्याही कामात यांचं लक्ष लागत नाही. हीच अवस्था प्रत्येक चहा प्रेमीची असते. कारण यांच्यासाठी चहा म्हणजे अमृत. सकाळी उठल्यानंतर बहुतांश जण पाण्याऐवजी थेट चहाच पिणे पसंत करतात. तुमच्याही दिवसाची सुरुवात ‘बेड टी’नं होते का?

तर मग वेळीच सावध होणे गरजेचं आहे. चहा पिऊन दिवसाची सुरुवात करणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं केवळ दुष्परिणामच होतात. अति चहा पिणाऱ्यांना असंख्य शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. पण समस्यांचे मूळ नेमकं कुठे आहे, हेच त्यांना शोधून सापडत नाही. तुम्ही देखील पोट आणि पचनाशी संबंधित आजारांमुळे हैराण आहात का? जाणून घ्या यामागील कारण

ऊर्जा नाही उदासीनता वाढते:-

शरीर अ‍ॅक्टिव्ह व्हावं यासाठी कित्येक जण दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. तुम्हाला ऐकून थोडंसं विचित्र वाटेल पण चहानं तुमचं शरीर अ‍ॅक्टिव्ह होत नाही तर उलट यामुळे उदासीनता अधिक वाढते. रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास उदासीनता, तंद्री लागणे, रडण्याची इच्छा होणे यांसारख्या मानसिक तक्रारी वाढतात.

चहामध्ये असणाऱ्या कॅफीनमुळे शरीरावर वाईट पद्धतीनं दुष्परिणाम होतात. चहाचे सर्वाधिक वाईट परिणाम मानसिक आरोग्यावर होतात.

​आतड्यांमधील बॅक्टेरियावर होतो परिणाम:-

आपल्या शरीराची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवण्यामागे आतड्यांमधील बॅक्टेरियाची भूमिका महत्त्वाची असते. आरोग्य निरोगी राहण्यासाठी पचन संस्थेचं कार्य सहज होण्यासाठी आणि आवश्यक एन्झाइमची निर्मिती करण्यासाठी हे बॅक्टेरिया मदत करतात.

पण रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं या बॅक्टेरियांच्या  कार्यात अडथळा निर्माण होतो. यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. पोट स्वच्छ नसल्यानं अल्सर, तोंड येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.

​लघवीला जास्त होणे:-

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानं वारंवार लघवी होण्याची समस्या निर्माण होते. यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी असंतुलित होते. चहामधील कॅफीन आणि अन्य घटक शरीरातील पाणी बाहेर फेकण्याचं काम करतात.

यामुळे आपल्याला सतत तहान लागते आणि वारंवार लघवीला जाण्याची वेळ येते.

जास्त प्रमाणात चहा पिणाऱ्यांना रात्री वेळी-अवेळी देखील लघवीला जाण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. यामुळे झोपेवरही परिणाम होतात.

अति चहाचे सेवन घातकच:-

अति चहा प्यायल्यानं हृदय विकार होण्याचा धोका असतो. चहामधील कॅफीनमुळे कार्डिओव्हॅस्क्युलर विकार आणि अनिद्राच्या समस्या वाढतात. यामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो.

वारंवार चहा प्यायल्यानं डोके दुखीचाही त्रास निर्माण होतो.

चहामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे चिंता, तणाव, थायरॉइडचा त्रास वाढतो. हृदयात जळजळ होणे गर्भावस्थेमध्ये अधिक प्रमाणात चहा प्यायल्यास गर्भपात किंवा बाळाचे वजन कमी होण्याची भीती असते.

तसेच अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे डॉक्टर  फरहाद इस्लामी यांच्या म्हणण्यानुसार बर्‍याच लोकांना चहा, कॉफी किंवा इतर पेय गरम गरम पिण्याची सवय असते. तथापि, संशोधन अहवालानुसार, जास्त गरम चहा पिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की यामुळे तोंड आणि घशातील अस्तर खराब होते,

आणि कोलिन अर्बुद इंधनास कारणीभूत ठरू शकते. संशोधनात असेही म्हटले आहे की जर तुम्हाला एसोफेजियल कर्करोगापासून सुरक्षित रहायचे असेल तर तुम्हाला चहा सोडण्याची गरज नाही, परंतु कमीतकमी 4 मिनिटे थांबा आणि चहा किंवा इतर गरम गोष्टी किंचित थंड झाल्यावरच घ्या. असे केल्याने कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.


Posted

in

by

Tags: