जर आपल्याला सुद्धा रात्री झोप येत नसेल…तर थोडे तूप घेऊन करा हे उपाय त्वरित झोप लागलीच समजा…फक्त करा हे घरगुती सोपे उपा

नेक लोक आहेत, जे झोपेच्या समस्येने त्रस्त आहेत. अनेकजण झोपेसाठी बरेच उपाय करतात. परंतु, तरीही या समस्येवर आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील या समस्येमुळे त्रस्त असाल, तर आम्ही एक उपाय घेऊन आलो आहोत. ज्यामुळे आपल्याला चांगली झोप लागेल. चला या उपायांबद्दल जाणून घेऊया.

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात तूप सहज उपलब्ध आहे. तूप आपल्या आरोग्यासाठीचं चांगले नाही, तर पुरेशी झोप येण्यासही फायदेशीर आहे. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवाकर यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आरामदायक झोपेसाठी तूप कसे वापरावे, याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पुरशी झोप येण्यासाठी तूपाचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊयात.

प्रतीकात्मक चित्र

प्रथम एका भांड्यात तूप काढा. तुपात एक बोट बुडवून ते आपल्या पायांच्या तळव्यांवर लावा. आता पायाच्या तळव्याची तळहाताने मालिश करा. सऱ्या तळपायाचीदेखील अशीचं मालिश करा. यामुळे आपल्याला चांगली झोप येईल.

खरं तर, पचन आणि पोषकद्रव्ये शोषण्यास मदत करण्याशिवाय, तूप आपल्याला रात्री चांगली झोप तसेच इतर आरोग्यासाठी बरेच फायदे देते. अगदी तूप रात्री केसांवर किंवा पायांच्या तळांवर आरामात लावला जाऊ शकतो. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टच्या म्हणण्यानुसार रुजुता दिवेकर तिच्या पायांवर तूप लावतात, विशेषत: झोपेच्या आधी, हिवाळ्यात, चांगली झोप मिळण्याबरोबरच सांधेदुखी आणि इतर अनेक वेदनांपासून मुक्त होण्यास मदत होते. म्हणूनच दररोज तूप लावण्याची सवय लावावी, ज्याचा फायदा तुम्हाला होईल.

प्रतीकात्मक चित्र

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

तसेच नियमित मसाज केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याची समस्या कमी होते. वयाच्या 30व्या वर्षानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि बारीक रेषा दिसू लागतात. यापासून समस्या सुरु होण्याआधीच रोखण्यासाठी दररोज 5 ते 8 मिनिटांसाठी चेहऱ्यावर मसाज करा. तसेच, चेहऱ्यावर मालिश करण्यासाठी आपण चांगली उत्पादने वापरली पाहिजेत.

प्रतीकात्मक चित्र

रक्त प्रवाह वाढतो.

चेहऱ्यावर मसाज केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे तुमच्या त्वचेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते. चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये वरच्या बाजूस मसाज करा. दररोज 5 मिनिटांचा मसाज त्वचेला नवसंजीवनी प्रदान करतो.

आयुर्वेदाने दिलेल्या ‘पादाभ्यंग’ या सहज सोप्या आणि घरच्या घरीही करणे शक्य असलेल्या प्रभावी उपचार पद्धतीबाबत जाणून घ्या.. पूर्वीच्या काळी लग्नाच्या आहेरात हमखास दिल्या जाणाऱ्या काशाच्या वाटीमागे आरोग्यदायी संकेत दडला आहे. पादाभ्यांग / पायाला मसाज करताना काशाच्या वाटीचा कशा प्रकारे वापर करावा आणि त्याचे आरोग्यदायी फायदे याबाबत

प्रतीकात्मक चित्र

काशाची वाटी म्हणजे काय ? कांस्य हा मिश्र धातू तांबे आणि जस्तमिश्रित असतो. त्यापासून तयार केलेल्या वाटीने पायाला मसाज केल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. सोन्यापेक्षा स्वस्त आणि सामान्यांच्या आवाक्यात असलेल्या कांस्य या धातूपासून काशाची वाटी बनवली जाते.

शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता आणि वात कमी करण्यासाठी काशाची वाटी प्रभावी ठरते. पायाला तेल, तूप लावून मसाज करण्याच्या प्रक्रियेला उपचार पद्धतीला पादाभ्यंग म्हणतात. आबालवृद्धांनी नियमित पायाला मसाज करणे आवश्यक आहे. कारण आयुर्वेदानुसार डोके, कान आणि पाय या तीन अवयवांमध्ये वात वाढण्याची शक्यता अधिक असते. वेळीच त्याचा निचरा न झाल्यास शरीरात काही दोष, आजार वाढण्याची शक्यता बळावते.

काशाच्या वाटीने पायाला मसाज केल्याने वात कमी होण्यासोबतच पायाच्या तळव्याला भेगा पडणे, पायात आग, जळजळ जाणवणे अशा समस्या कमी होतात.

शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांच्या जाळ्यांचे एक टोक पायापाशी असल्याने तेथे मसाज केल्यानंतर शरीरातील थकवा कमी होण्यास मदत होते. शरीरात थंडावा वाढतो.

डोळ्यांचे आरोग्य पायांवर अवलंबून असल्याने डोळ्यांच्या स्नायूंना तेथील नसांना चालना मिळण्यासाठी पायाला मसाज करणे फायदेशीर ठरते.

त्वचेतील शुष्कता कमी होऊन मुलायमपणा वाढतो.
पायांना मसाज केल्याने निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहते.

मसाज करण्याची योग्य वेळ कोणती ?
रात्री झोपण्यापूर्वी पायाला मसाज केल्यास शरीरात थंडावा निर्माण होऊन शांत झोप मिळण्यास मदत होते. यासोबतच सकाळी अंघोळीपूर्वी अर्धा तासदेखील मसाज करणे फायदेशीर ठरते.

मसाज करण्याची योग्य पद्धत कोणती ?
काशाच्या वाटीने पायाला मसाज करताना तेल किंवा तुपाचा वापर करणे आवश्यक आहे. तुपाऐवजी पायाला मसाज करताना कोमट तिळाच्या तेलाचा किंवा खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. पायाला पडलेल्या भेगा भरण्यासाठी भिंडेल किंवा कोकमचे तेल फायदेशीर ठरते.


Posted

in

by

Tags: