आपल्याला पण आहे मुतखड्याचा त्रास…तर अजिबात करू नका या पदार्थांचे सेवन…अन्यथा आपली डोकेदुखी वाढलीच समजा

आपल्याला पण आहे मुतखड्याचा त्रास…तर अजिबात करू नका या पदार्थांचे सेवन…अन्यथा आपली डोकेदुखी वाढलीच समजा

अनेकांना किडनीस्टोनचा त्रास होतो. हा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी न पिणं, आहाराचं पथ्यपाणी न सांभाळल्याने किडनीस्टोनचा त्रास बळावतो. काही रूग्णांमध्ये किडनीस्टोनचा त्रास हा वारंवार उद्भवण्याचीही शक्यता असते. म्हणूनच किडनीचं आरोग्य जपायचं असेल तर आहारात सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे.

का खाणं टाळाल ?

किडनीस्टोनचा त्रास असणार्‍यांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मुबलक आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी न पिणं हे किडनीस्टोनचा त्रास होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. किडनीस्टोनच्या रूग्णांनी भाज्यांमध्ये, फळभाज्यांमध्ये अधिक बीया असलेल्या भाज्यांचा समावेश करणं टाळावे. यामुळेदेखील किडनीस्टोनचा त्रास वाढू शकतो.

पालक:-

पालक खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. पालक हा लोहाचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. पालकांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थ असतात, परंतु ज्यांना मुतखड्याची समस्या आहे त्यांनी पालक सेवन नये.

कारण पालकात ऑक्सलेट असते जे स्वतः रक्तात असलेल्या कॅल्शियमशी जोडते आणि आपल्याला लघवी करताना त्रास होतो. अशा परिस्थितीत, मुखड्याच्या रुग्णांनी पालकांचे सेवन केल्यास त्यांना अधिक त्रास होऊ शकतो.

मीठ:-

मुतखड्याने ग्रस्त असलेल्या रुग्णांनी मीठाचे जास्त सेवन करणे टाळावे कारण मीठात सोडियम असते. जर मीठ जास्त प्रमाणात खाल्ले तर ते यूरिनमध्ये कॅल्शियम गोठवण्याचे कार्य करते. तसेच किडनी स्टोनमुळे ग्रस्त असलेल्या रुग्णांनी चिप्स, इत्यादी पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे कारण त्यात मीठ जास्त असते.

चिकन, मासे:-

काही पदार्थांमध्ये किडनी स्टोन तयार करणारे यूरिक अॅसिड आणि प्यूरिनसारखे तत्त्व असतात. त्यामुळे किडनी स्टोन असताना मांस, मासे, वांगी, मशरुम, फ्लॉवर खाऊ नये.

सॉफ्ट ड्रिंक्स:-

कोल्ड ड्रिंक्स, मांस, मासे खाऊ नये. फळांमध्ये स्ट्रॉबेरी, बोरं, अंजीर, किशमिश हे खाऊ नये. तसेच दूध आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ जसे की, दही, पनीर, टॉफी, कॅन सूप, नूडल्स, तळलेले पदार्थ, जंक फूड, चिप्स आणि चहाचं जास्त सेवन करु नये.

किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. पण जास्तीत जास्त ही समस्या खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे होते. मीठ आणि शरीरातील इतर खनिज जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा किडनी स्टोन होतो. याचा काही ठरलेला आकार नसतो. कधीकधी हे स्टोन लघवीच्या माध्यमातून बाहेत पडतात पण कधी कधी यामुळे होणाऱ्या वेदना सहस्य होतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *