पांढरे कोड किंवा विटोलिगोची असू शकतात ही लक्षणे…यामुळे होऊ शकतो आपल्याला हा रोग त्यामुळे या लोकांनी तर त्वरित सावध व्हावे…अन्यथा

पांढरे कोड किंवा विटोलिगोची असू शकतात ही लक्षणे…यामुळे होऊ शकतो आपल्याला हा रोग त्यामुळे या लोकांनी तर त्वरित सावध व्हावे…अन्यथा

मुलांच्या चेह-यावर किंवा शरीरावरील कोणत्याही अवयवावर सफेद रंगाचा डाग दिसू लागणं हा चिंतेचा विषय असू शकतो. चेह-यावरील या हाइपोपिगमेंटिड स्पॉची अनेक कारणं असू शकतात. या समस्येवर योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत असं वाटत असेल तर मुलाल डॉक्टरकडे घेऊन जा. मुलांना होणारे त्वचेचे आजार हे पालकांच्या मनात भीती निर्माण करत असतात.

त्वचेवर उठलेले डाग, चट्टे, पुरळ हे प्रत्येक वेळेस भयंकर आजार असल्याची चिंताही त्यांना भेडसावत असते. बरेचसे त्वचेचे आजार संसर्गजन्य असले तरी काही आजार जीवनसत्वांचा अभाव, पुरेसे घटक न मिळणे यामुळे होत असतात हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.

प्रतीकात्मक चित्र

कडक उन्हात हिंडल्यानेसुद्धा पांढरे डाग दिसायला लागतात. अपघात, घरात कुणाचा मृत्यू, घटस्फोटासारख्या समस्येमुळे मानसिक तणाव यामुळेसुद्धा मेलॅनिनची निर्मिती थांबते आणि पांढरे डाग दिसू लागतात.

कोड किंवा पांढरे डाग संपूर्ण शरीरावर किंवा शरीराच्या काही भागावर दिसतात. त्वचेला रंग देणाऱ्या रंगपेशी मेलानोसाइटस काही कारणाने नष्ट होतात आणि त्यांची पुन्हा निर्मिती होत नाही. अशावेळेस त्वचा पांढरी पडते.

प्रतीकात्मक चित्र

विटिलिगो असू शकतो:-

त्वचेवर डिपिगमेंटेशन विटिलिगो होऊ शकतो जो की मेलानोसाइटस कमी असल्या कारणामुळे होतो. मेलानोसाइटस त्या पेशी असतात ज्या मेलानिन नामक त्वचेच्या पिग्मेंटला बनवतात. विटिलिगो शरीराच्या प्रत्येक भागाला प्रभावित करतं. यामध्ये ओठांवर डिपिगमेंटेशन आणि सफेद केस येणं यासारखे प्रकार घडतात.

प्रतीकात्मक चित्र

सफेद दाग किंवा विटिलिगो हे होण्याचे स्पष्ट कारण अजूनही समजू शकले नाहीये. त्वचेवर रंग निर्माण करणा-या मेलानोसाइटसच्या कमी असण्याने किंवा असक्रियेतेमुळे म्हणजेच अर्थात बनू न शकल्याने त्वचेवर सफेद रंगाचे डाग येऊ शकतात. अनुवंशिक कारणांमुळे किंवा ऑटोइम्‍यून स्थितीमध्ये इम्युन सिस्टम आपल्याच मेलानोसाइसवर हल्ला करु लागतो आणि याच कारणामुळे विटिलिगो होऊ शकतो.

हा आजार कोणत्याही वयातील व्यक्तीला आणि कोणत्याही रंगाच्या व्यक्तीला होऊ शकतो. तरीही बालपण आणि किशोरावस्था या दरम्यान मुलांमध्ये ही समस्या जास्त भेडसावताना दिसून येते.

प्रतीकात्मक चित्र
आयुर्वेदानुसार हा आजार टाळण्यासाठी रुग्णाने तांब्याच्या भांड्यात आधी आठ तास पाणी ठेवले पाहिजे आणि नंतर ते प्यावे. गाजर, सोयाबीन, डाळी, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. तसंच कडधान्याची भाजी शक्य तितक्या जास्त प्रमाणात खावी. साबण आणि डिटर्जंटचा वापरही कमी केला पाहिजे.

अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद या रोगापासून बरे होण्याची शक्यता आहे. डॉक्टर औषधे, थेरपी आणि शस्त्रक्रिया यांच्या मदतीने त्यावर उपचार करतात. म्हणूनच, यावर सर्वात मोठा उपाय म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला या आजाराची लक्षणे दिसतात तेव्हा आपण त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *