जर आपल्याला सुद्धा लघवी करताना जळजळ होत असेल किंवा आपल्याला सुद्धा मूत्र संसर्ग झाला असेल….तर आजचं करा हे उपाय झटक्यात मिळेल आराम

मूत्र मार्गाला होणार संसर्ग हा अत्यंत गंभीर व्याधी आहे. त्यामुळेच या संदर्भातील लक्षणे आढळून आल्यास त्याकडे काणाडोळा न करता योग्य उपचार घेणे फायद्याचे ठरते. ही लक्षणे कोणती आहेत, तसेच यावर कसे उपचार करायचे, या विषयी जाणून घेऊ या. मॉर्डन लाईफस्टाईलमुळे आजकाल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हा त्रास कॉमन झाला आहे.

यामागील मुख्य कारण म्हणजे अस्वच्छ पब्लिक टॉयलेटचा वापर करणं. कारण आजही भारतात तुम्ही प्रवासाला किंवा रोज अगदी नोकरी करायला बाहेर पडल्यासही नाईलाजास्तव तुम्हाला अस्वच्छता असलेल्या पब्लिक टॉयलेटचा वापर करावाच लागतो. पण तरीही या समस्येकडे गंभीरतेने पाहिलं जात नाही. त्यामुळे अनेकदा महिला या इन्फेक्शनच्या बळी पडतात. तसं पाहता हे तेवढं गंभीर इन्फेक्शन नाही पण जर वेळेवर इलाज न केल्यास याचा किडनीवर वाईट परिणाम होऊ शकतो. तर दुसरीकडे घरातील टॉयलेटची नियमित रूपाने सफाई न केल्यासही तुम्हाला हे इन्फेक्शन होऊ शकतं.

वेलचीचे फायदे

असं होतं इन्फेक्शन:-

युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन हे इतकं कॉमन आहे की, प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यात एकदा तरी या इन्फेक्शनचा उपचार करून घ्यावा लागतोच. युटीआई तेव्हा होतं जेव्हा बॅक्टेरिया किंवा फंगस आपल्या पचन तंत्रातून निघून किंवा इतर माध्यमातून लघवीच्या मार्गावर चिकटतात आणि वेगाने वाढत जातात. जर या इन्फेक्शनकडे वेळीच लक्ष न दिल्यास बॅक्टेरिया तुमच्या ब्लॅडर आणि किडनीपर्यंत पोहचू शकतात आणि तुम्हाला इजा होऊ शकते.

नारळाचं पाणी:-

लघवी करताना होणारी जळजळ ही खूपच त्रासदायक असते. यावरील रामबाण घरगुती उपाय म्हणजे नारळाच पाणी. आपल्या सगळ्यांनाच नारळ पाणी  प्यायला आवडतं. मग जर तुम्हालाही लघवीला गेल्यावर जळजळ किंवा दुखत असेल तर नारळाच पाणी हा उत्तम आणि सोपा उपाय आहे. नारळामध्ये खूप गुणकारी तत्त्व आहेत जी लघवीमुळे होणारी जळजळ, वेदना आणि बैचेनी यांसारख्या समस्या दूर करतात. आपल्या शरीरात ही समस्याही तेव्हाही निर्माण होते जेव्हा आपलं शरीर डीहायड्रेट होतं आणि त्यातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात नारळाचं पाणी प्यायल्याने लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदनेपासून सुटका मिळू शकेल.

आवळा (प्रतीकात्मक फोटो)

व्हिटॅमीन सी चं आपल्या निरोगी आरोग्यात खूप महत्त्वाचं योगदान आहे. लघवीच्या वेळी होणारी जळजळ आणि वेदना थांबवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तुम्ही व्हिटॅमीन सी युक्त पदार्थाचं सेवन करू शकता. व्हिटॅमीन सीमुळे आपल्या लघवीतील अॅसिडची मात्रा वाढते आणि त्यामुळे बॅक्टेरियाचा नायनाट होतो. परिणामी इन्फेक्शनचा धोका कमी होतो. फळ आणि भाज्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमीन सी आढळतं. लिंबाचा रस, संत्र्याचा रस, किवी फ्रूट, द्राक्ष आणि आवळा हे व्हिटॅमीन सी चे खूप चांगले स्त्रोत आहे. ज्याचं सेवन केल्यास तुमचं युरिन इन्फेक्शन नक्कीच कमी होईल.

प्रतीकात्मक चित्र

तुम्हाला हा घरगुती उपाय ऐकून थोड आश्चर्य वाटेल पण हाही एक रामबाण उपाय आहे. कारण अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये एन्झाईम, पॉटेशिअम आणि खूप प्रमाणात खनिज आढळतात. तसंच यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणही असतात. जे शरीरातील बॅक्टेरिया आणि फंगची वाढ होऊ देत नाही. तसंच लघवीला होणारी जळजळ आणि वेदनाही दूर करतात.

दहीचे फायदे

दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. प्रत्येकीकडे रोज ताजं दही लावलं जातं. हेच दही तुम्हाला युरिन इन्फेक्शनमुळे होणारा त्रासही दूर करू शकतं. याचं मुख्य कारण म्हणजे दह्यात आहे वाईट बॅक्टेरियाचा नाश करण्याची ताकद आणि चांगला बॅक्टेरिया वाढवण्याची क्षमता. जर तुम्च्या योनीमध्ये बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झाल्यास दह्यामुळे नक्कीच आराम मिळेल आणि pH स्तरही सामान्य राहील.


Posted

in

by

Tags: