या लोकांनी कधीही करू नये लसणाचे सेवन…अन्यथा लवकरच आपल्याला मृत्यूला द्यावे लागेल…त्यामुळे त्वरित सावध व्हा

लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण जेवणाची चवचं फक्त वाढवत नाही तर लसूण खाण्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. लसूणमध्ये मँगनीज, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C, सेलेनियम, फायबर्सचे प्रमाण भरपूर असते याशिवाय त्यात कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह यासारखे अनेक पोषकतत्त्वही असतात.

प्रतीकात्मक चित्र

लसूण कसे खावे..?
लसूण खाण्याचा आपल्या शरीराला उपयुक्त फायदा होण्यासाठी लसूण पाकळ्या सोलून बारीक तुकडे करून 5 ते 10 मिनिटे तशीच ठेवावीत त्यानंतर ते बारीक तुकडे खावेत. असे केल्यामुळे त्या बारीक केलेल्या लसूण तुकड्यांमध्ये Allicin हे प्रभावी घटक तयार होते. Allicin हे अँटी-ऑक्सिडंट्स, Anti-inflammatory गुणांचे असून त्यामुळे हृदयाचे विकार, हाय ब्लडप्रेशर, हाय कोलेस्टेरॉल व कँसर होण्यापासून आपले रक्षण होते.

प्रतीकात्मक चित्र

रोगप्रतिकारशक्ती सुधारते..
‎रोज लसूण आहारात असल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे हवामान बदलामुळे होणाऱ्या सर्दी आणि खोकला अशा आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. सर्दी आणि खोकल्यावर लसूण घालून केलेला चहा अत्यंत गुणकारी आहे.

प्रतीकात्मक चित्र

हिमोग्लोबिन वाढवते..
‎शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच ‎लसणात डायली-सल्फाईड असते त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.

प्रतीकात्मक चित्र

लसूण कोणी खाऊ नये..?
ज्यांना पोटाचे विकार, अतिसार, ऍलर्जी, लो-ब्लडप्रेशर यासारखा त्रास आहे त्यांनी लसूण खाऊ नये. तसेच लसूण खाण्यामुळे रक्त पातळ होत असते त्यामुळे एखादी शस्त्रक्रिया झाल्यावर सुरवातीचे काही दिवस लसूण खाणे टाळावे.

गरोदरपणात लसूण खावीत का..?
गरोदरपणात आहारातून लसूण खाऊ शकता त्यामुळे गरोदरपणात होणारा मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या नियंत्रित राहतील. मात्र प्रसूतीची तारीख जवळ आल्यावर काही आठवडे लसूण खाणे टाळावे. कारण रक्त पातळ होऊन प्रसूतीमध्ये अतिरक्तस्त्राव (ब्लिडींग) होण्याचा धोका वाढतो.

मधुमेह रुग्ण लसूण खाऊ शकतात का..?
लसूण खाण्यामुळे रक्तातील साखर एकाएकी कमी होऊ शकते. त्यामुळे मधुमेह रुग्णांनी लसूण खाताना पुरेशी काळजी घ्यावी. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार नियोजन करावे. शक्यतो मधुमेह रुग्णांनी कच्ची लसूण खाऊ नये. आहारातुन काही प्रमाणात लसूण खाऊ शकता.


Posted

in

by

Tags: