लाल कांद्यापेक्षा किती तरी पटीने फायदेशीर आहे पांढरा कांदा…पुरुषांसाठी तर रामबाण उपाय आहे…अनेक गुप्तरोग होऊ शकतात यामुळे नाहीसे

लाल कांद्यापेक्षा किती तरी पटीने फायदेशीर आहे पांढरा कांदा…पुरुषांसाठी तर रामबाण उपाय आहे…अनेक गुप्तरोग होऊ शकतात यामुळे नाहीसे

भारतीय स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरली जाणारी भाजी किंवा वस्तू म्हणजे कांदा आपल्याला माहित आहे की कांद्याशिवाय कोणतीही डिश अपूर्ण मानली जाते. कांदा केवळ अन्नाची चवच सुधारत नाही तर त्यात भरपूर प्रमाणात पोषकद्रव्ये आणि संरक्षणात्मक घटक देखील असतात जे आपल्याला विविध रोगांशी लढण्यास मदत करतात.

बाजारात तुम्हाला साधारणपणे लाल आणि पांढरा कांदा दिसेल. तरी या दोघांचे वेगवेगळे फायदे आहेत, परंतु आरोग्याच्या बाबतीत पांढरा कांदा खूप फायदेशीर मानला जातो. तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला पांढऱ्या  कांद्याच्या काही महत्त्वपूर्ण आरोग्यासाठी असलेल्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत.

पुरुषांसाठी रामबाण औषध:-पांढर्‍या कांद्याचा वापर वीर्य वाढीसाठी होतो. याचे मधासह सेवन केल्यास आपल्याला त्याचा दुहेरी फायदा होतो. कांद्यातील अँटीऑक्सिडंट्स शुक्राणूंना नैसर्गिकरित्या वाढविण्यास मदत करतात.

ह्रदय स्वस्थ राहते:- पांढऱ्या कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट आणि कम्पाउंड आढळतात. हे घटक शरीरावरील सूज कमी करण्याचे कार्य करतात. तसंच ट्रायग्लिसराइडची पातळी देखील कमी करतात, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी घटण्यास मदत मिळते. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते.

पाचक प्रणाली मजबूत करते:-पांढर्‍या कांद्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या पोटाच्या आरोग्याची काळजी घेतात. कांद्यामध्ये प्रीबायोटिक इनुलीन आणि फ्रुक्टो ऑलिगोसाकॅराइड्स भरपूर प्रमाणात असतात आणि त्याचे नियमितपणे सेवन केल्यास पोटात चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढते.

​कर्करोगाशी लढणारे गुणधर्म:- पांढऱ्या कांद्यामध्ये सल्फर, फ्लेव्होनॉइड आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत; ज्यामध्ये कर्करोगाशी लढण्याची क्षमता असते. कांद्यामधील सल्फर, क्वेर्सेटिन फ्लेव्होनॉइड आणि अँटी ऑक्सिडंट ट्युमरची वाढ रोखण्याचे कार्य करतात.

रक्त पातळ करते:- पांढऱ्या कांद्यातील औषधी गुणधर्मांमुळे रक्त पातळ होण्यासही मदत मिळते. यामधील फ्लेव्होनॉइड आणि सल्फर शरीरातील रक्त पातळ करण्यास मदत करतात. रक्त पातळ करणारे एजंट किंवा ब्लड थिनर शरीराच्या नसांमध्ये  रक्तप्रवाह सुरळीत सुरू ठेवण्याचे कार्य करतात.

रक्तातील साखरेची पातळी राहते नियंत्रणात:-पांढऱ्या कांद्यातील क्रोमियम आणि सल्फर हे घटक रक्तातील शर्करा घटवण्याचे कार्य करतात व शर्करेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदतही करतात.

जे मधुमेहग्रस्त आहेत किंवा ज्यांना मधुमेहाचा धोका आहे, अशा लोकांसाठी पांढऱ्या कांद्याचे नियमित व मर्यादित स्वरुपात सेवन करणे फायद्याचे आहे; अशी माहिती अभ्यासाद्वारे समोर आली आहे. तसेच यामध्ये आढळणारी क्वेर्सेटिन आणि सल्फर यासारखी काही संयुगे अँटी- डायबेटिक असतात.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *