फक्त २०० रुपयांच्या एका नोटेने या शेतकऱ्याला रातोरात बनवले लखपती…जाणून घ्या असे काय केले या शेतकऱ्याने

मध्य प्रदेशातील एका गरीब शेतकऱ्याने पन्ना जिल्ह्यात जमीन भाड्याने घेतली आणि या जमीनने त्याला लक्षाधीश केले. आपल्याला कदाचित माहित असेल की पन्ना जिल्हा हा हिऱ्यासाठी प्रसिद्ध असून या जिल्ह्यात शासनाने अनेक जमीनी भाड्याने घेतल्या आहेत.

आता एका शेतक्याने सुद्धा 200 रुपयांच्या भाडेपट्ट्यावर सरकारकडून जमीन घेतली आणि दिवस-रात्र या जागेमध्ये त्याने खोदकाम सुरु केले. शेतकर्‍याला त्याच्या मेहनती फळ मिळाले आणि त्याला जमिनीमधून 14.98 कॅरेटचा हिरा मिळाला.

शेतकरी लखन यादव हा पन्ना जिल्ह्यातील आहे. लखन यादव याने 200 रुपयांच्या भाडेपट्ट्यावर जमीन घेतली. लखन यादव याच्या म्हणण्यानुसार, जमिनीमध्ये खोद काम  करताना त्याला एक चमकणारी वस्तू दिसली आणि तो एक हिरा आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. पण लखन यादवने जेव्हा त्या हिऱ्याची चौकशी केली तेव्हा त्याचे होश उडून गेले. कारण या हिऱ्याचे वजन 14.98 कॅरेट होते.

याबाबत माहिती देताना खनिज विभागाने सांगितले की, लखन यादवला मिळालेला हिरा 60 लाखांचा आहे. हिरा मिळाल्यावर लखन यादव म्हणाले की या हिऱ्याने माझे आयुष्य बदलले आहे आणि माझ्या या आयुष्यातील हा क्षण मी कधीच विसरणार नाही.

हिऱ्याकडून मिळालेल्या रकमेचे आपण काय करणार असे लखन यादवला विचारले गेले असता. तो म्हणाला की हे पैसे ते आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतील. तो म्हणाला की मी अभ्यास केलेला नाही, पण मी माझ्या चार ही मुलांना चांगले शिक्षण देईन. मी त्याच्यासाठी अनेक ठिकाणी गुंतवणूक करीन.

गावातून काढून टाकण्यात आले होते:-लखन यादव म्हणाला की, पन्ना येथे राष्ट्रीय उद्यान तयार करतांना बऱ्याच लोकांना बाहेर काढण्यात आले होते आणि त्यात त्यांचा सुद्धा समावेश होता. त्याला गावातून काढून टाकले असता त्याला एक लाखांची भरपाई देण्यात आली होती आणि त्याने त्यातून एक हेक्टर जमीन व मोटारसायकली खरेदी केल्या होत्या.


Posted

in

by

Tags: