कोरडी त्वचा, त्वचा फुटणे व खाज, त्वचा लाल पडणे या समस्यांनी त्रस्त असाल… तर करा आजचं ‘हे’ ५ घरगुती उपचार…

थंडीपासून बचाव करण्यासाठी वापर-या जाणा-या गरम कपड्यांमुळे अंगाला खाज सुटणे सामान्य गोष्ट आहे. असं साधारणत: त्या लोकांसोबत होतं ज्यांची त्वचा रूक्ष व कोरडी असते. कारण या प्रकारची त्वचा खूप लवकर आपली नैसर्गिक आद्रता किंवा ओलावा गमावते. अशा परिस्थितीत लोकरीपासून बनवलेले उबदार कपडे घातल्याने त्वचेचा कोरडेपणा अधिकच वाढतो. ऋतूबदलामध्ये त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते.

कारण सततच्या या ऋतूबदलांमुळे त्वचेचा पोत बदलतो. त्वचा खराब होते. अशावेळी त्वचेला काळजी व पोषणाची आ‍वश्यकता असते. आपण सतत हानिकारक रसायने, द्रव्यांचा मारा त्वचेवर करत असतो त्यामुळे त्वचेचं भयंकर नुकसान होतं. त्यामुळे बाजारातील कोणतेही प्रोडक्ट्स वापण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा! चला तर जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून वाचवण्याचे व त्वचेतील आद्रता टिकवून ठेवण्याचे उपाय.

मॉइशचराइज

सर्वात आधी त्वचेतील वाढता कोरडेपणा रोखण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी हिवाळ्यात अंघोळीसाठी जास्त गरम पाण्याचा वापर करु नका. तर थंड व गरम पाणी एकत्र करुन पाण्याचं तापमान सामान्य ठेवा. जेव्हा त्वचा ओली असेल तेव्हा मॉईश्चराईजर लावा. आंघोळ केल्यानंतर नेहमी त्वचा हळूवार पुसून घ्या. त्वचेतील ओलावा कायम राहण्यासाठी आंघोळ केल्यावर तीन ते पाच मिनिटांच्या आत मॉईश्चराईजर लावा.

चेहरा दिवसातून वारंवार धुणं टाळा. शक्य असल्यास फक्त रात्री चेहरा धुवा. ज्यामुळे चेहऱ्यावरील धूळ निघून जाऊन त्वचा कोरडीही पडणार नाही. ओठांसाठी चांगल्या व घरगुती लिपबामचा वापर करा. त्या लिपबाममध्ये पेट्रोलिअम जेली आणि मिनरल ऑईल असलं पाहिजे. थंडीच्या काळात बाहेरील थंडाव्यापासून बचाव करण्यासाठी चेहरा नेहमी स्कार्फने झाकून घ्या.

अंघोळीच्या आधी मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास त्वचेवर कोरडेपणा किंवा रुक्षपणाची समस्या निर्माण होत नाही. तुम्ही इतर कोणत्याही तेलाचा वापर मालिश करण्यासाठी नक्कीच वापरु शकता. पण त्वचेवरील आद्रता टिकवून ठेवण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम पर्याय मानला जातो. कारण त्यात त्वचेतील कोरडेपणा दूर करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. स्वयंपाकामध्येही मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो. हे तेल केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचा आणि केसांच्या देखभालीसाठीही लाभदायक असते.

सनस्क्रीन:-

उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचे सनस्क्रीन वापरणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल बाजारामध्ये अनेक प्रकारचे सनस्क्रीन लोशन उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यातले नेमके कोणते सनस्क्रीन निवडावे याबाबत तुमचा गोंधळ उडण्याची शक्यता असते.

ऑर्गेनिक व मिनसल्स असे एकूण दोन प्रकारचे सनस्क्रीन एजंट्स असतात. ऑर्गेनिक एजंट अतिनील किरणे शोषून घेतात व त्वचेपासून त्यांचे संरक्षण करतात.त्यामधील अनेक घटक हे कार्य करतात.पण हे कार्य ३ ते ४ तासांसाठी मर्यादीत असते यासाठी सतत सनस्क्रीन लावणे गरजेचे असते.

खाजेवर उपाय:-

रात्री झोपण्याआधी संपूर्ण शरीराला अ‍ॅलोव्हेरा जेल म्हणजे कोरफडीचा गर लावा. हे जेल तुम्ही अंडरआर्म्स मध्येही लावू शकता. कारण तिथली त्वचा खूपच संवेदनशील असल्यामुळे बहुतांश लोकांना लोकरीच्या कपड्यांमुळे अंडरआर्म्स मध्ये इचिंगची समस्या होते. अ‍ॅलोव्हेरा जेलमध्ये अ‍ॅटीफंगल गुणधर्म असतात व हे व्हिटॅमिन ‘ई’ ने परिपूर्ण असतं. हे दोन्ही घटक त्वचेसाठी लाभदायक असतात. हे लावल्याने ना त्वचा कोरडी पडते ना शरीरावर खाज सुटते.

तसेच हिवाळ्यात तहान कमी लागत असल्यामुळे आपण पाण्याचे सेवन कमी करतो. त्यामुळे शरीर व त्वचा हायड्रेटेड राहत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. शिवाय त्वचा कोरडी पडत असल्यास झोपण्यापूर्वी रात्री व सकाळी उठल्यावर त्वचेवर खोबरेल तेल लावावे. खोबरेल तेलातील स्निग्ध पदार्थांमुळे त्वचा मऊ व तजेलदार राहते. लिंबू सरबत, ताक या पेयांचे प्रमाण वाढवा. फळे, भाज्या, तृणधान्ये अशा पदार्थांचा आहारातील समावेश वाढवा.


Posted

in

by

Tags: